अंधश्रद्धेला बळी न पडता हिवतापाचे निदान रुग्णालयात करा : जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक

392

– गडचिरोली जिल्हा हिवताप कार्यालया मार्फत हिवताप प्रतिरोध महिना साजरा
The गडविश्व
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा आदिवासी, नक्षलग्रस्त व हिवताप संवेदनशिल जिल्हा आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता हिवतापाचे निदान रुग्णालयात करावे, रुग्णालयात हिवतापाचे पूर्णतः निदान केले जाते असे प्रतिपादन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केली.
जिल्ह्यातील भौगोलीक क्षेत्र हे डोगंरदऱ्याने व जंगलव्यात असल्यामुळे तसेच विषम हवामानामुळे हिवताप आजाराला प्रसासासाठी पोषक असे हवामान आहे. जिल्हयात भामरागड, एटापल्ली, अहेरी, धानोरा, कुरखेडा व कोरची या तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात हिवतापाचे रुग्ण आढळून येत असतात. या करीता नागरिकांमध्ये हिवताप आजाराविषयी जनजागृती व्हावी या करीता जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत संपूर्ण जिल्ह्यात १ ते २५ एप्रील या कालावधीत हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात आला व कार्यक्रमाअंतर्गत जनजागृती करण्यात आली.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक हे पुढे माहिती देताना म्हटले कि, जिल्ह्यातील प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात हिवतापाबाबत जनजागृती करण्यात येत आहे तसेच नुकताच झालेल्या पुष्कर मेळाव्यात सुद्धा याची जनजागृती करण्यात आली. अंधश्रद्धेमुळे हिवताप झालेले जिल्ह्यातील आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे हे कुठेतरी थाटले पाहिजे याकरिता मोठ्या प्रमाणात जनजागृती करून हिवतापाचे निदान रुग्णालयात करण्यात यावे असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.

– या कार्यक्रमाअंतर्गत जनजागृती

सक्रीय संक्रमीत रुग्ण शोधमाहीम : जिल्ह्यातील हिवताप आजाराचा समुळ नायनाट करण्यासाठी सक्रीय संक्रमीत रुग्णांचा शोधघेण्यासाठी १७ फेब्रुवारी ते २७ मार्च या कालावधीत हिवताप शोधमोहीत राबविण्यात आली.यामध्ये भामरागड,एटापल्ली, अहेरी, धानोरा व कोरची या तालुक्यातील १५ प्रा.आ. केन्द्रातील २३५०२० लोकसंख्येचे मास सर्वेक्षण करण्यात आले व दुषीत रुग्णांना औषधोपचार देण्यात आले.

गप्पीमासे सोडणे : गप्पीमासे हे डासांचे अळीभक्षक आहेत. डासोपत्ती स्थानामध्ये डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अश्या ठिकांणाचा शोध घेऊन गप्पीमासे सोडण्यात आले.

मच्छरदानी वापरासंदर्भात आरोग्य शिक्षण : सन २०२१ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात १९७००० मच्छरदानी वितरीत करण्यात आलेले आहे. या मच्छदानीचा नियीमत वापर करावा या संदर्भात गावपातळीवर आशा सभा ग्रामसभा आयोजीत करुन नागरीकांमध्ये मच्छदानीचा उपयोग वाढविण्यासंदर्भात आरोग्य शिक्षण देण्यात आले.

कोरडा दिवस पाळणे : घरातील टाके, रांजण, मडके यामध्ये डासांची वाढ होते या करीता आठवड्यातू एक दिवस कोरडादिवस पाळणे आवश्यक आहे. जेणेकरुन डासांची वाढ रोखणे शक्य होईल. या करीता ग्रामपंचायत स्तरावर आरोग्स सभा घेऊन कोरडा दिवस पाळण्याच्या सुचना नागरिकांना देण्यात आल्या.

प्रभात फेरीचे आयोजन : नागरिकांमध्ये हिवताप आजाराविषयी जनगागृती व्हावी या करीता गावस्तरावर शांळाच्या माध्यमाने वैद्यकिय अधिकारी यांनी प्रभातफेरीचे आयोजन केलेले होते. विद्यार्थ्याना हिवताप आजाराची माहिती देऊन बचाव कसा करावा या विषयी आरोग्य शिक्षण देण्यात आले. तसेच २५ एप्रील २०२२ रोजी जिल्हा शल्य चिकीत्सक गडचिरोली डॉ. अनिल रुडे, व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांचे उपस्थित गडचिरोली शहरात प्रभातफेरी काढण्यात आली.

डासोत्पत्ती स्थानांचा शोध : जिल्हा हिवताप संवेदनशिल तालुक्यातील गावाच्या २ किमी परिसरातील डासोत्पती स्थानांचा शोध घेण्यात येऊन नोंदी करण्यात आलेली आहे.

वरील प्रमाणे विविध माध्यमांचा वापर करुन हिवताप आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी कार्यवाहीकरण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी संजय मीना,व मुख्यकार्यकारी अधिकारी कुमार आर्शिवाद यांच्या मार्गदर्शनाखाली हिवताप प्रतिरोध मोहीम राबविण्यात आली.अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी पत्रकार परिषद माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here