अखेर पालकमंत्री वडेट्टीवार धावले आजारी असलेल्या व्यक्तीच्या मदतीला

208

– सावली येथील आजारी व्यक्तीला दिला आधार
The गडविश्व
सावली : येथील पोटाच्या आजाराने त्रस्त असलेल्या सुरेश गजाननजी गावतुरे (४५) यांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आर्थिक मदत करून एक आधार दिला आहे.
यावेळी उपस्थित सावली नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ. लताताई लाकडे , शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी तथा नगरसेवक नगर पंचायत विजय मुत्यालवार, नगरसेवक वाळके, बांधकाम सभापती तथा नगरसेवक नगर पंचायत नितेशजी रस्से, नगरसेविका सौ.साधनाताई वाढई, नगरसेवक गुणवंत सुरमवार व संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री असून त्यांनी अनेकांना आधार दिलेला आहे. सावली येथील सुरेशजी गावतुरे यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना पोटाचा आजार जडलेला आहे. ही माहिती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सावली काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष विजय मुत्यालवार यांच्याशी चर्चा करून ही बाब पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या लक्षात आणुन दिले. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी याची गंभीर दखल घेऊन तात्काळ मदतीचे आश्वासन देऊन काही दिवसांतच ही आर्थिक मदत संपूर्ण काँग्रेस चे पदाधिकारी यांनी जाऊन मदत पोहचवून दिली.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जातात. अश्यातच त्यांनी आर्थिक मदत देऊन त्यांना आधार दिले. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत गरीब जनतेची सेवा करण्याचे वचन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here