The गडविश्व
सावली , १४ ऑक्टोबर : लोकसमग्रह समाज सेवा संस्था, बल्लारपूर संचालित “सचा गडेरीया” प्रकल्पा अंतर्गत संत थॉमस चर्च, शेणगाव यांच्या संयुक्त विध्यामाने क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर यांच्या सहकार्याचे माता विहार नर्सिंग होम, शेणगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला अध्यक्ष फा.जॉनी , संचालक शांती निवास चर्च पाठागुडा , तर प्रमुख पाहुणे फा. थॉमस पुलेशेरी, संचालक, लोकसमग्रह संस्था, फा. जोसेफ के., संचालक, क्राईस्ट हॉस्पिटल, चंद्रपूर, सि. बर्था,सि.आँनशीन, सि.जॉईसी, तज्ञ व मार्गदर्शक म्हणून डॉक्टर मंगेश चांदेवार, अस्थी रोगतज्ञ क्राईस्ट हॉस्पिटल, चंद्रपूर, डॉ. शेख, PHC, शेणगाव, भास्कर ठाकूर समन्वयक अधिकारी, जोसेफ दोमाला, समन्वयक अधिकारी, कविता दोमाला क्राईस्ट हॉस्पिटल, एस. शंभरकर, फार्मॅलिस्ट, माधव डोईफोडे, तंटामुक्ती अध्यक्ष, शेणगाव,सुधाकर कांबळे , अजय तिरंकार, पंढरी वाघमारे, दिगंबर कलवले, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांनी आरोग्य स्वच्छता व आजार होऊ नये या करिता घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये बी .पी .शुगर, चर्मरोग अस्तीरोग व इतर आजारावर मोफत तपासणी करण्यात आले व निदान झालेल्या आजारावर मोफत औषधे देण्यात आले. या शिबिरामध्ये ६७५ लोकांनी शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराचे सूत्रसंचालन अजय तिरनकर यांनी केले तर , प्रास्ताविक भास्कर ठाकूर समन्वयक अधिकारी यांनी तर आभार सुधाकर कांबळे, समाज सेवक यांनी मानले.
शिबीर यक्षस्वीते करिता सागर नगराडे, संदीप कांबडे, रवी सूर्यवंशी, प्रकाश गोठमुखले, उद्धव तोगरे, सूर्यकांत वाघमारे समस्त गावकरी यांनी परिश्रम घेतले .