The गडविश्व
गडचिरोली, ८ नोव्हेंबर : शोषित पीडित वंचितांच्या हितासाठी त्यांच्या समस्यांना घेऊन कार्य करीत असल्या बद्दल महाराष्ट्र शासन जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त अनुप कोहळे यांना पाथ फाउंडेशन च्या वतीने “समाज प्रेरक” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अनुप कोहळे नेहरू युवा केंद्र व शिवकल्याण युथ मल्टीपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून युवकांच्या कल्याणाकरीता, त्यांच्या सर्वांगीण विकासा सोबतच जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना घेऊन कार्य करत असतात. कमलापुर हत्ती कॅम्प वाचवा मोहिमेत देखील मोठी भूमिका त्यांनी लेखन आणि इतर माध्यमातून बजावली आहे.
पाथ फाऊंडेशन चे संचालक बोधी रामटेके लिखित ‘न्याय’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त लेखा मेंढा येथे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून आमदार डॉ.देवराव होळी, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत नरेन गेडाम, पत्रकर रोहिदास राऊत, ज्येष्ठ साहत्यिक कुसुमताई आलाम, माजी जि.प. सदस्य लालसू नागोटी, यशोधरा उसेंडी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पंकज नरुले यांनी केले.