– नवीन ग्रामपंचायत भवनाची ग्रा.पं.पदाधिकाऱ्यांची जि.प.सीईओ यांना मागणी
The गडविश्व
चिमूर, १८ जुलै : तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी प्रसिद्ध असलेल्या कोलारा गेट येथील ग्रामपंचायत भवन गळत असून या इमारतीला भेगा पडलेला आहे. त्यामुळे गळती इमारतीत गावाचा कारभार कसं चालवायचा असा प्रश्न उपस्थित झाला असून नवीन ग्रामपंचायत भावनाची मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
गाव विकासाकरीता ग्राम पंचायत हे केन्द्र बिंदू आहे . कोलारा (तु) ग्राम पंचायत येथे अंदाजे २५- ३० वर्षा पुर्वीची इमारत आहे. याच इमारतीत गावाचा कारभार सुरू आहे, भितीवर भेगा पडलेल्या असून, स्लॅबवर तडे गेले असून खिपले पडल्यास जिवीतास धोका निर्मान होऊ शकतो. तसेच गळती असल्याने इमारतीवर काळी पाल छावणी लावण्यात आली आहे मात्र तरीही पाणी गळत आहे.” ग्रामपंचायत मध्ये अनेक गाव विकासाचे महत्याच्या दस्ताऐवज, रेकार्ड, कॉम्पूटर, टेबल, खुर्चावर आदी साहीत्य असतात परंतु ग्रामपंचायत गळतीमुळे महत्वाचे रेकार्ड, साहित्य भिजतात त्यामुळे ग्राम पंचायत पदाधिकाऱ्याना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नविन ग्राम पंचायत भवनाचा प्रस्ताव जिल्हा परिषद चंद्रपूर मुख्य कार्यकारी अधिकारी याना सादर केला असून नविन ग्राम पंचायत भवनाच्या प्रस्तावाला मान्यता दयावी अशी मागणी सरपंचा शोभाताई कोयचाडे, उपसरपंच सचिन डाहूले, सदस्य अविनाश गणविर, विनोद उईके, सोनु वैध, प्रियंका भरडे, अरुणा चौधरी, सिंधु नैताम, गणेश येरमे यांनी मागणी केली
“दहा – पंधरा वर्षापासुन ग्राम पंचायत इमारत गळते परंतु याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, ग्रा,पं. पदाधिकारी नविन ग्रामपंचायत भवनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदला दिला असुन मुख्य कार्यकारी अधिकारी यानी मान्यता दयावी, येणाऱ्या मासिक सभेमध्ये ग्राम पंचायत स्थानातरणाचा प्रस्ताव ठेवून, तात्पुरती ग्राम पंचायत स्थलांतराचे ठिकाण ठरवले जाईल.’
– सौ.शोभाताई धनराज कोयचाडे
सरपंचा, ग्रा,पं. कोलारा (तु)