– कलाविश्वाला मोठा धक्का
The गडविश्व
मुंबई : अभिनेते प्रदीप पटवर्धन (pradip Patavardhan) यांचे मुंबईच्या राहत्या घरी निधन झालं आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट, मराठी दुरचित्रवाणी यांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. ‘मोरुची मावशी’ या नाटकातून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर प्रदीप यांच्या ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेने देखील प्रेक्षकाचे भरभरून मनोरंजन केले. एवढेच नाही तर ‘महाराष्ट्राची जत्रा’ कार्यक्रमातून त्यांनी सर्वांना पोट धरुन हसण्यास भाग पाडले. रंगभूमीवरचा हसता-खेळता नट काळाच्या पडद्या आड गेल्यामुळे कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले, असे म्हणायला हरकत नाही.
प्रदीप पटवर्धन यांनी ‘एक फुल चार हाप’, ‘डान्स पार्टी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘एक शोध’, ‘चष्मे बहाद्दर’, ‘गोळा बोरीज’, ‘जर्नी प्रेमाची’, ‘थँक यू विठ्ठला’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मोलाची भूमिका साकारली.