अमरावतीत बनणार जगातला सगळ्यात मोठा स्कायवॉक

358

– मोदी सरकारने दिली बांधकामाची परवानगी
The गडविश्व
नवी दिल्ली : जगात स्वीझरलँड आणि चीन या ठिकाणी स्कायवॉक आहे. स्वीझरलँडचा स्काय वॉक ३९७ मीटर, तर चीनचा स्काय वॉक ३६० मीटरचा आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तयार होणारा प्रस्तावित स्कायवॉक ४०७ मीटरचा म्हणजेच जगातील सर्वात लांब स्कायवॉक असणार आहे. मात्र, चिखलदरा स्कायवॉकच्या बांधकामात काही अडथळे आले. आता हे अडथळे दूर झाले आहेत. राज्याच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने या स्कायवॉकच्या बांधकामाला परवानगी दिली आहे.

केंद्राच्या परवानगीमुळे आता चिखलदरा येथील स्काय वॉकचे काम लवकरच पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात नुकतीच याबाबत बैठक झाली होती. तसेच केंद्र शासनाकडून परवानगी मिळण्यासाठी राज्य शासनाने पाठपुराव्याची मागणी यशोमती ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार तात्काळ पाठपुरावा होऊन केंद्र सरकारची परवानगी प्राप्त झाली आहे. त्यामुळे स्कायवॉक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here