अमिर्झा नजीक मालवाहू पिकअप पलटून अपघात : दोघांचा मृत्यू , चारजण जखमी

1808

– रस्त्यावरील खड्डा चुकवतांना अपघात

The गडविश्व

अमिर्झा, १९ जुलै : वडसा देसाईगंज ( Wadasa-Desaiganj) येथून गडचिरोली येथे अमिर्झा (Amirza) मार्गे ग्रेनॉइट टाईल्स व इतर साहित्य घेऊन जाणारा पिकअप वाहन अमिर्झा नजीक रस्त्याच्या कडेला पलटून सोमवार १८ जुलै रोजी रात्रो ८ वाजताच्या सुमारास अपघात घडला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून इतर चार जण जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

धनराज विठोबा झिलपे ( ४५) रा. शिवराजपुर ता. देसाईगंज जि. गडचिरोली , अतुल जनार्धन झोडे (२५) रा. उसेगाव ता. देसाइंगज जि. गडचिरोली अशी मृतकांची नावे आहे तर विलास अशोक चहादे (२६) रा. गांधी नगर देसाइंगज, रुपेश भास्कर आत्राम (५०) रा. फरी ता. देसाइंगज, कालेश्वर निलकंट मेश्राम (२६) रा. शिवराजपुर ता. देसाइंगज जि. गडचिरोली, वाहन चालक विक्रम सुभाष मोहुर्ले (२३) रा. कोकडी ता. देसाइंगज जि. गडचिरोली अशी गंभीर जखमींची नावे आहेत. जखमींवर प्रा. आ. केंद्र अमीर्झा येथे उपचार चालु आहे.प्राप्त माहितीनुसार, वडसा देसाईगंज येथून ग्रेनॉइट टाईल्स व इतर साहित्य घेऊन एमएच ३३ के ४११६ क्रमांकाचा पिकअप वाहन गोगाव नजीकच्या नदीला पूर असल्याने  वडधा-अमिर्झा मार्ग गडचिरोली (Gadchiroli) येथे सोमवार १८ जुलै रोजी रात्रोच्या सुमारास जात होते. दरम्यान अमिर्झा नजीक पुढील येणाऱ्या दुचाकी वाहनाला रस्ता देताना आपल्या बाजूने रस्त्यावरील खड्डा चुकवतांना मालवाहू पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला पलटून अपघात झाला. यावेळी वाहनात असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहे.
अपघाताची माहिती गडचिरोली पोलीस स्टेशन ला देण्यात आली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनाकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले व जखमींवर प्रा. आ. केंद्र अमीर्झा येथे उपचार चालु आहे.
जखमींची प्रा.आ.केंद्र अमीर्झा येथे भेट घेऊन पोलिसांनी विचारपुस केली असता कालेश्वर निलकंट मेश्राम (२६) रा. शिवराजपुर ता. देसाइंगज जि. गडचिरोली यांच्या लेखी तक्रारी वरुन वाहन चालक विक्रम सुभाष मोहुर्ले (२३) रा. कोकडी ता. देसाइंगज जि. गडचिरोली याच्यावर हयगयीने व निष्काळजीपणाने वाहन चालवुन वाहनातील मजुराचे मरणास, तसेच गंभीर दुखापतीस कारणीभुत अशा विवीध कलमान्वये गुन्हा नोंद करुन पुढील तपास गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरंविदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ / प्रभाकर भेंडारे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here