अवैध दारूविक्री बंद करून नगराचा विकास करा

200

– सिरोंचा शहरातील महिलांचे नगराध्यक्षाना निवदेन
The गडविश्व
गडचिरोली : नगर पंचायत निवडणुकीत आपण दिलेल्या वचनाची अंमलबजावणी करा. सिरोंचा शहरातील काही वार्डात सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आपण पुढाकार घेऊन शहरातील अवैध दारू हद्दपार करा व नगराचा विकास करा, अशी मागणी शहरातील महिलांनी नगराध्यक्षांकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा शहरातील काही वार्डात मिळत असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे सर्वात जास्त त्रास महिलांना सहन करावा लागतो. शहरात दारू उपलब्धीमुळे कमी वयाचे मुले, तरूण दारूकडे वळत आहेत. शहरातील काही वार्डात अवैध दारू विक्री पूर्णत: बंद झाल्यास पुरुषांमधील दारू पिणे बंद होईल, घरात, वार्डात होणारे भांडण तंटे कमी होतील.शहरातील गुन्ह्यांच्या संख्येत घट होईल. त्यामुळे अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी सहकार्य केल्यासनगराचा विकास करण्यास जनतेची चांगली साथ मिळेल. त्यामुळे शहरातील अवैध दारूविक्री बंद करून शहराच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, अशी एकमुखी मागणी विविध वार्डातील महिलांनी नागराध्यक्षाकडे निवेदनातून केली आहे. यावेळी नगराध्यक्ष यांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी नक्की प्रयत्न करू, असे सांगितले. तसेच कोणत्या वार्डांमध्ये दारू विक्री सुरु आहे याची सुद्धा माहिती जाणून घेतली. गरज असलेल्या वॉर्डांत व्यसन उपचार शिबिर घेऊ असेही त्यांनी सांगितले.

वचनाचे पालन करा

जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुका मुख्यालयातील विविध वार्डात सुरु असलेली अवैध दारूविक्री बंद करुण दिलेल्या वचनाचे पालन करा, अशी विनंती शहरातील विविध वार्डातील महिलांनी नगराध्यक्ष रामबाई महाका यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी नगराध्यक्षांनी आपण सहकार्य करण्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here