– माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची प्रमुख उपस्थिती
The गडविश्व
अहेरी, २१ ऑक्टोबर : अहेरी येथील बस स्थानकात इंग्रजाविरुध्द स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्य वीर बाबूराव शेडमाके यांच्या आज पुण्यतिथिचे औचित्य साधून अहेरी येतील महापरिवहन विभागाकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून अभिवादन केले. यावेळी आगार प्रमुख व्ही.राठोड, प्रमुख पाहुणे म्हणून आलामी, सडमे, आगार, संयोजक गणेश चांदेकर, सतीश कुमरे आणि एस टी कस्टकरी उपस्थित होते