आदिवासी गावे प्रधानमंत्री आवास योजनेपासून वंचित

435

– घरकुलाचा लाभ देण्याची मागणी
The गडविश्व
सावली : तालुक्यातील सादागड, सादागड हेटी, मानकापूर, चकमानकापूर, मेटेगाव ही आदिवासी गावे असून घरकुलांची गरज आहे मात्र प्रधानमंत्री आवास योजनेच्या आवास प्लस मध्ये असलेल्या चुकांमुळे ‘ब’ व ‘ड’ यादीत नाव असूनही 7 वर्षांपासून घरकुल लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात शिष्टमंडळाने मुख्यकार्यकारी अधिकारी यांना घरकुलाचा लाभ देण्याची मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी घरकुलाचा लाभ न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सादागड, सादागड हेटी, मानकापूर, चकमानकापूर, मेटेगाव ही संपूर्ण आदिवासी गावे सावली तालुक्यात येतात मात्र ग्रामपंचायत मुल तालुक्यातील टेकाडी, मुरमाडी मध्ये आहेत. त्यामुळे विविध योजना राबविण्यास अडचणी येत आहेत. या गावातील प्रधानमंत्री आवास योजना घरकुल लाभार्थ्याची नावे ग्रामपंचायत चारगाव येथील ‘ब’ व ‘ड’ यादीत आहेत परंतु लाभ देतांना ऑनलाईन अडचणीमुळे मागील 7 वर्षांपासून वंचित राहावे लागत आहे. घरकुलाच्या प्रतीक्षा यादीत 81 लाभार्थ्यांची नावे आहेत परंतु प्राधान्यक्रम शेवटी असल्याने घरकुलांची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे या गावातील आदिवासीवर अन्याय होत आहे. अनेकदा याबाबत अवगत करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याने शिष्टमंडळाचे वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना गटविकास अधिकारी यांचे मार्फतीने निवेदन पाठविण्यात आले. घरकुल न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. माजी सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात पंचायत विस्तार अधिकारी राजू परसावार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराज वेटे, सुरेश गेडाम, संजय दळांजे, रोशन मडावी, महेश कुसराम, नरेंद्र कोवे, रविंद्र कोवे, उमेश मडावी आदींनी निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here