आदिवासी विद्यार्थी संघाच्या प्रयत्नाने पंदेवाही येथील महिलेचे शव पोहचले घरी

511

– जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा पुढाकार व आर्थिक मदत

The गडविश्व
एटापली : जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा पुढाकाराने आदिवासी विद्यार्थी संघाच्या प्रयत्नाने मृत महिलेचे शव घरी पोहचले आहे. यावेळी जि. प.अध्यक्षांनी कुटुंबाला आर्थिक मदतही केली.
एटापली तालुक्यांतील पंदेवाही येथील महिला मेस्सी गिल्ला आत्राम (४३) हि आजारी असल्याने अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती करून उपचार सुरू होते.मात्र रात्रोच्या सुमारास निधन झाले. शव घरी नेण्यास वाहन उपलब्ध नसल्याने नातेवाईकांसमोर अडचण निर्माण झाली होती. सदर बाब आदिवासी विद्यार्थी संघाचे सचिव प्रज्वल नागुलवार यांनी भ्रमणध्वनी वरून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहिती दिली व आपबिती सांगितली. यावेळी जि.प.अध्यक्ष गडचिरोली येथे असल्याने अहेरी येथील कार्यकर्त्यांना सांगितले असता आज सकाळी सदर महिलेचा मृतदेह अहेरी वरून पंदेवाही नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था व आर्थिक मदत आदिवासी विध्यार्थी संघाकडून करण्यात आली. यावेळी आदिवासी विद्यार्थी संघाचे शहर अध्यक्ष प्रशांत गोडसेलवार, राकेश सड़मेक, प्रभाकर मडावी, प्रकाश दुर्गे यांनी रूग्णालयात जावून शव वाहनाने पंदेवाही येथे पाठविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here