आमगाव येथे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

293

The गडविश्व
कुरखेडा, २५ ऑगस्ट : तालुका कृषी अधिकारी कार्यालय आमगाव तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ( पी एम एफ एम इ ) प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज २५ ऑगस्ट २०२२ रोजी मंडळ कृषी अधिकारी च कार्यालयात करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून तालुक्यातील जिल्हा संसाधन व्यक्ती सौ. पुस्तकला खैरे तसेच संदीप डोळे व तालुक्यातील सर्व बँक प्रतिनिधी तसेच तालुका कृषी अधिकारी विकास कुंभारे, मंडळ कृषि अधिकारी भगत, कृ प ब्राम्हणकर, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सेंगर व माविम चे तालुका व्यवस्थापक सौ.दखणे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित नागरिकांना विविध माहिती देत मार्गदर्शन केले. दरम्यान उपस्थित असलेल्या नागरिकांनी माहीती समजून घेतली।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here