आमदार डॉ. होळी यांच्या कडून महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या फोटोंचे विविध आदिवासी वसतिगृह व शासकीय कार्यालयात वितरण

281

– जिल्ह्यातील सर्वच आदिवासी वसतिगृह व शासकीय कार्यालयात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू याच्या फोटोंचे वितरण करणार

The गडविश्व
गडचिरोली, २५ जुलै : राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्याबद्दल महामहीम द्रोपदी मुर्मू जी यांचे तमाम आदिवासी समाजाकडून मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा देत प्रदीर्घ काळ केलेली जनसेवा आणि आदिवासी समाजात शैक्षणिक जनजागृतीसाठी केलेल्या कार्याचा दांडगा अनुभव नक्कीच मार्गदर्शक ठरेल व त्यांच्या नेतृत्वात देश अधिकाधिक यशस्वी वाटचाल करेल तथा आदिवासी समाजाने महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मर्मू यांच्या कडून प्रेरणा घ्यावा असा विश्वास गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केली व आज देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेऊन पद ग्रहण केल्याबद्दल महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मर्मु यांच्या फोटोंचे आमदार डॉ देवराव होळी यांचे कडून गडचिरोली येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह व विविध शासकीय कार्यालय, पंचायत समिती कार्यालय गडचिरोली, तहसील कार्यालय गडचिरोली, आदिवासी मुलींचे वसतिगृह व विविध शासकीय कार्यालय येथे पंचायत समितीचे उपसभापती भाजप नेते विलास पाटील दशमुखे, भाजपा गडचिरोली तालुका महामंत्री हेमंत भाऊ बोरकुटे, संतोष दशमुखे, मनोज किरमिरे यांच्या हस्ते*वितरण करण्यात आले. या फोटोंच्या वितरण करतांना प्रामुख्याने तहसीलदार गणवीर, गटविकास अधिकारी पदा, गृहपाल काळे श्रीमती मडावी यांनी महामहीम राष्ट्रपती यांच्या फोटोंच्या स्वीकार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here