– नगरसेविका गिताताई सेलोकर यांची मागणी
The गडविश्व
ता.प्र. / आरमोरी (नरेश ढोरे) : जवळपास ३० ते ३५ हजार लोकसंख्या असलेल्या आरमोरी शहरात सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यातच मागील तीन चार महिन्यांपासून शहरात नागरीकांना तीन दिवसांतून एकदाच नळाचे पाणी मिळत आहे. आरमोरी शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या लवकरात लवकर निकाली काढण्यात यावी अशी मागणी नगरसेविका गिताताई सेलोकर यांनी मुख्याधिकारी यांचेकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आरमोरी शहरातील पाणीपुरवठा वैनगंगा नदिवरून करण्यात येत आहे. मात्र ६० एच.पी. चे दोन्ही पंप मागील दोन तीन महिन्यांपासून बंद असून ३५ एच. पि. च्या एकाच पंपावरुन पाणी पुरवठा होत असल्याने शहरात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मात्र या बाबींकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
सदर दोन्ही नादुरुस्त पंप दुरुस्ती साठी नागपूरला पाठवले असे सांगण्यात येत असल्याचे नगरसेविका गिताताई सेलोकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
यापुर्वी गाढवी नदिवरून शहरात पाणि पुरवठा होत होता परंतु अनेक वर्षांपासून गाढवी नदिवरून होणारा पाणीपुरवठा बंद करून फक्त वैनगंगा नदिवरूनच संपुर्ण शहराला पाणी पुरविला जात असून संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हि समस्या निर्माण होत असल्याचा आरोपही नगरसेविका गिताताई सेलोकर यांनी निवेदनात केला आहे.
नागरीकांना योग्य प्रमाणात पाणि मिळत नसताना प्रत्येक मासीक सभेत पाणिकर वाढविण्यासाठी विषय मांडला जातो. सदर समस्या १५ दिवसांत दूर करून नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करून समस्या निकाली काढण्यात यावी अन्यथा नागरीकांच्या सहनशीलतेचा भडका उडाल्यास होणाऱ्या परिणामास जबाबदार नगरपरिषद राहिलअसा इशारा नगरसेविका गिताताई सेलोकर यांनी निवेदनातून दिला.