ईडी ची धडक कारवाई : महाराष्ट्रात वर्षभरात 2167 कोटींची संपत्ती केली जप्त

228

The गडविश्व
मुंबई : ईडीने गेल्या वर्षभरात एकट्या महाराष्ट्रात धडक कारवाया केल्यात की यातल्या जप्तीचा आकडा पाहिल्यानंतर कुणीही थक्क होईल. ईडीने तब्बल 2167 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्याची माहिती उघड झाली आहे.
महाराष्ट्रात रासपचे माजी आमदार रत्नाकर गुट्टे यांची 255 कोटी रुपयांची संपत्ती ताब्यात घेतली आहे. जप्तीची कारवाई त्यांच्यावर डिसेंबर 2020 मध्येच झाली होती. त्यात आता 635 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात ईडीने हे पुढचे कडक पाऊल टाकले.
ईडीचा फेरा आला की राजकारण्यांना धडकी भरते, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. ईडी अर्थात एन्फोर्समरेंट डिरेक्टोरेट, मराठीत अंमलबजावणी संचालनालय. नाव थोडसे किचकट वाटत असले तरी ही संस्था आणि तिचं काम आता सर्वांना चांगलेच माहिती झाले.
तब्बल 2167 कोटी, तेही केवळ महाराष्ट्रात. प्रताप सरनाईक, एकनाथ खडसे, अनिल देशमुख यांच्यासारख्या अनेक नेत्यांच्या संपत्तीचा यात समावेश आहे. तर पीएमसी बँक घोटाळा, एचडीआयएल, डीएचएफएल अशी काही कॉर्पोरेट उद्योगातली नावेही यात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here