उद्या मुग्दाई धबधबा डोमा येथे “पैदागीर” चित्रपटाचे प्रमोशन

1831

The गडविश्व
चिमुर, २७ ऑगस्ट : तालुक्यातील डोमा येथील निसर्गरम्य माना समाजाचे आराध्य दैवत असलेल्या मुग्दाई धबधबा येथे उद्या रविवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता मुग्दाई चॅरिटेबल ट्रस्ट डोमा, आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र, ब्राईट एज फाउंडेशन भिवापूर, समता सैनिक दल, सम्यक विद्यार्थी आंदोलन, ओबीसी महासंघ च्या वतीने सम्मा दिठ्ठी फिल्म प्रस्तुत “पैदागीर” शिक्षणाची संघर्षगाथा या मराठी चित्रपटाचे प्रमोशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
“पैदागीर” या चित्रपटात चित्रपट सुष्टीचा सर्वोकृष्ट दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त नायकांचा समावेश आहे. चित्रपटाचे दिग्ददर्शन संजय जिवने यांनी केले आहे. तर या चित्रपटात गौरव अंबारे हे मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत, सांची जीवने हया अभिनेत्री म्हणून तर जय भगत हा बाल कलाकार म्हणून तसेच इतरही कलावंत चित्रपटात दिसणार आहेत.
उद्या मुग्दाई धबधबा डोम येथे होणाऱ्या प्रमोशन प्रसगी चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जीवने, अभिनेते गौरव अंबारे, अभिनेत्री सांची जीवने, बाल कलाकार जय भगत उपस्थित राहणार आहेत.
प्रमोशन कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मुग्दाई ट्रस्ट डोमा चे अध्यक्ष रामराव ननावरे, फुले शाहु आंबेडकर विचारधारा प्रचारक संजय बोधे, वनाधिकार कायदा अभ्यासक भगवान ननावरे, ओबीसी कर्मचारी युनियन चंद्रपूरचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास कांबळी, आ.मा.ज.वि.युवा संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष राहुल दडमल, ब्राईट एज फाउंडेशन, भिवापूरचे अध्यक्ष श्रीकांत एकुडे, लोकसमृध्दी बचन निधी लिमिटेड शेगावचे कार्यकारी संचालक संदीप खडसंग, आश्रय जन चॅरिटेबल सोसायटी गडचिरोलीचे अध्यक्ष राजु केदार, भिवापूरी मिरची युटयुबर प्रिती जांभूळकर, ओबीसी महासंघ चिमूर उपाध्यक्ष श्रीकृष्ण जिल्हारे, महासचिव विजय डावरे, तरूण पर्यावरणवादी चिमुर कवडू लोहकरे, आंबोली ग्रामपंचायत सदस्य शुभम मंडपे, उपसरपंच वैभव ठाकरे, समता सैनिक दल चिमुरचे अध्यक्ष ऋषिकेष मोटघरे, संघटक अस्मिक रामटेके, चिंचाळा शास्त्री ग्रामपंचायतचे सदस्य गौतम धनविजय, ओबीस सेवा संघ चिमुर चे समीर बल्की उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here