उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेचा अनेक रुग्णांनी घेतला लाभ

177

The गडविश्व
कुरखेडा : स्थानिक उपजिल्हा रुग्णालय हे एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनवारोग्य योजनेत समाविष्ठ आहे. या आरोग्य योजनांमुळे गरिबांना नविन आशेचे किरण दिसत आहे.
उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे आजपर्यंत १३२ रुग्णांनी या योजनेतून शस्त्रक्रिया व उपचार घेतला असुन, सदर योजना यशस्वी करण्याकरीता या रुग्णालयातील वैद्यकिय अधिक्षक तसेच सर्व वैद्यकिय अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी रुग्णांना योग्य मागदर्शन करीत समाधानकारक उपचार करून देत आहेत. गडचिरोली जिल्हयात समाविष्ठ ८ रुग्णालयापैकी मुख्य तीन नामांकित रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा यांची उत्कृष्ठ कार्याबद्दल निवड करण्यात आली. व जिल्हाअधिकारी गडचिरोली यांचेतर्फे प्रमाणपत्र सुध्दा बहाल करण्यात आले.
या योजनेअंतर्गत विविध ३४ प्रकारच्या स्पेशॉलिटी असुन एकूण आजार ९९६/१२०९ ईतक्या उपचार व शस्त्रक्रिया सेवा विनामुल्य घेता येतात. या योजनेमध्ये कॅन्सर, हृदयरोग, किडणीचे आजार, लहान मुलांचे गंभिर आजार, स्त्रियांच्या गंभिर आजारांचा समावेश करण्यात आला आहे. एनिमिया, सिकलसेल, हॉयड्रोसिल, हर्निया, गर्भपिशवीचे आजार, लहान मोठ्या गाठींचे आजार तसेच कोबीड रुग्णनी सुध्दा त्याचप्रमाणे विविध आजार असलेल्या रुग्णांनी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेतलेला आहे.

माहितीकरिता संपर्क

योजनेच्या अधिक माहीतीसाठी जिल्हाप्रमुख लिलाधर धाकडे, जिल्हा समन्वयक डॉ. प्रिती गोलदार योजनेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. कृतीका कवडे, जिल्हा पर्यवेक्षक लक्ष्मीकांत वास्नीक, आरोग्यमित्र दिक्षा जोगे यांच्याशी संपर्क साधावा.

आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळे, केशरी, अन्नपूर्ण, अंतोदय रेशनकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक रुग्णांचे सामान्य ओळखपत्र मदतान कार्ड, आधारकार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लॉयन्सस, शाळेचे ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र असने आवश्यक आहे. ज्यांचेकडे रेशनकार्ड नाही अशा नागरीकांनी तहसिलदाराचे प्रमाणपत्र दिल्यास या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आरोग्यमित्र यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विविध आजारांवर उपचारासह शस्त्रक्रिया

महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना गोर गरिबांसाठी लाभदायक आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया करता येतात. सुट्टी मिळाल्यानंतर रुग्णांना परतीचे प्रवास भाडे दिले जाते. त्यामुळे सामान्य नागरीकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे अवाहन उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथील वैद्यकिय अधिक्षक डॉ. कमलेश सि. परसवानी यांनी केलेले आहे. अधिक माहीतीकरीता महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना टोल फ्रि क्रमांक १५५३८८/१८००२३३२२०० वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here