उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनला भीषण आग

413

– आगीत ट्रेनच्या 5 बोगीं जळून खाक
The गडविश्व
बिहार : बिहारमधील रिकाम्या ट्रेनला भीषण आग लागून 5 बोगीं जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आगीमुळे आकाशात सर्वत्र धुराचे लोट दिसत असून या घटनेमुळे स्थानकात एकच गोंधळ उडाला.
मधुबनी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका रिकाम्या ट्रेनला भीषण आग लागली. या भीषण आगीत ट्रेनच्या 5 बोगी जळून खाक झाल्या.
रेल्वेला लागलेल्या आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत आहेत. या आगीचा व्हिडिओ समोर आला असून यात ही आग किती भीषण होती हे दिसून येते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here