एकाचवेळी २४ नक्षल्यांचे आत्मसमर्पण : १० महिला नक्षलींचा समावेश

1580

– पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या आत्मसमर्पन मोहिमेला यश
– अनेक नक्षली घटनांमध्ये सहभाग

The गडविश्व
सुकमा : जिल्ह्यात हिंसचाराच्या जीवनाला कंटाळून, नक्षल्याच्या पोकळ विचारसरणीला कंटाळून आणि सरकारच्या पुनवर्सन धोरणाने राबविल्या जाणाऱ्या पुना नरकोम ( नवी पहाट, नवी सुरुवात) या मोहिमेमुळे प्रभावित होऊन अनेक नक्षली आत्मसमर्पण करून सरकारच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहेत . सोमवारी एकाचवेळी २४ नक्षल्यांनी पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. यात १० महिला नक्षलींचाही समावेश आहे.
पोलीस दलमार्फत नक्षलविरोधी कारवाया व विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या होमकमिंग ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षली आत्मसमर्पण करीत आहेत.

सुकमाचे एसपी सुनील शर्मा म्हणाले की, जिल्ह्यात सातत्याने नक्षलविरोधी कारवाया सुरू आहेत. यासोबतच नक्षल्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहनही केले जात आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक नक्षली सातत्याने आत्मसमर्पण करत आहेत. सोमवारीही २४ नक्षल्यांनी एकाच वेळी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये १० महिला नक्षल्यांचा समावेश आहे. एसपी सुनील शर्मा पुढे म्हणाले की, किस्टाराम पोलिस स्टेशन हद्दीतील पोटकापल्ली येथे नवीन पोलिस कॅम्प उभारण्यात आलेआहे. या नव्या कॅम्पमध्ये दाखल झालेल्या पोटकपल्लीच्या ग्रामस्थांनी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून भरकटलेल्या नक्षली संघटनेच्या सदस्यांना कॅम्पमध्ये आणून पोलिसांसमोर त्यांचे आत्मसमर्पण केले. नक्षल संघटनेत राहून किस्ताराम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक मोठ्या नक्षली घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे. आत्मसमर्पण केलेले हे सर्व नक्षली मिलिशिया सदस्य म्हणून संघटनेत सक्रिय होते. पोलिसांनी या सर्व समर्पित नक्षल्यांना १० हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देत लवकरच त्यांना शासनाच्या पुनर्वसन धोरणांतर्गत सुविधा पुरविल्या जातील असे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here