कुरखेडा तालुक्यातील ९० शाळांमध्ये व्यसनविरोधी अभियान

417

मुक्तीपथ अभियानाचा उपक्रम

The गडविश्व
कुरखेडा : तालुक्यातील विविध ९० जिप व इतर शाळांमध्ये व्यसनविरोधी कृतीकार्यक्रम मुक्तिपथद्वारा करण्यात आले. तंबाखू व दारूच्या व्यसनाबाबत गावातील ८ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध खेळांच्या माध्यमातून विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गावा-गावातून विद्यार्थ्यांची रॅली काढून नागरिकांना व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले.
दरम्यान तंबाखू व दारू व्यसनाबाबत गावातील ८ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता करण्यात आली. गीत, तार टपाल टेलिफोन, डॉज बाल अशा विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. व्यसननाचे दुष्परिणाम व गांभीर्य सांगण्यात आले, गावाचा नकाशा काढून त्यात दारूची ठिकाणे, दुकान, पानटेले, गावातील शाळा, समाज मंदिर व इतर ठिकाण तयार करून ओळखीसाठी चिन्हांकित करण्यात आले. त्यांनतर गावात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. बाल सैनिकांची निवड करण्यात आली, तंबाखूजन्य पदार्थांची होळी करणे इत्यादी उपक्रम घेत तंबाखू व दारूच्या दुष्परिणामासंदर्भात जागृती करण्यात आली. या तालुक्यातील कुंभीटोला, चिखली, कढोली, खरमटाटोला, सावलखेडा, सोनसरी, शिरपूर, चांदागड, पळसगाव, विकास विद्यालय कुरखेडा, कातलवाडा,तळेगाव, धमदीटोला, चिखली, चिनेगाव, उराडी, दल्ली, रामगड, गेवर्धा, नागसेन विद्यालय गेवर्धा, येंगलखेडा आश्रमशाळा, मोटगाव, सोनेरांगी, खोब्रामेंढा, अंतरंगाव, खेडेगाव, पुराडा, जांभुळखेडा, हेटीनगर, खरकाडा, घाटी, गोठणगाव, मालदुगी, आंधळी, येंगलखेडा जिप शाळा, शिवणी, नवरगाव,वारवी,वडेगाव, सालई टोला, रानवाही, चिचेवाडा, नेहरपायली, नानी, चीचटोला, लक्ष्मीपूर, धनेगाव, चारभट्टी, मोहगाव, बांधगाव, अरततोंडी, खैरी, बेलगाव, वाघेडा, गांगोली, भगवानपूर, वाढोना, गुरणोली, देउळगाव, अंगारा, खडकी, येरकाडी, साधुटोला, खेडेगाव, सावतळा, नवेझरी, धुसी मसहात, मरारटोला, चिखलढोकडा,मौशी, कटांगटोला, कोसी,डोंगरगाव, जांभळी,कराडी,येडपूर, गरगडा, दादापुर, सालंगटोला इत्यादी गावांतील ९० शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध खेळांमध्ये सहभाग दर्शविला. यासाठी गाव संघटन सदस्य, शिक्षकांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here