कुरखेडा पंचायत समितीच्या माजी उपसभापतीवर प्राणघातक हल्ला

603

The गडविश्व
कुरखेडा : स्थानिक पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोज दूनेदार यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल शनिवारी रात्रो उशिरा घडली. या हल्ल्यात दूनेदार गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितिनुसार, कुरखेडा पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोज दूनेदार यांचे गोठणगाव नाक्यानजीक असलेल्या शेतात गोशाळा आहे. गोशाळेतील देखभाल करण्याकरिता एक कुटुंब रोजंदारीने ठेवले आहे. काल शनिवारी रात्रो दूनेदार हे रामगड वरून कुरखेडा येत असताना चार इसम त्यांच्या गोशाळेत असलेल्या कुटुंसोबत वाद घालत मारहाण करत होते. दरम्यान दूनेदार यांनी त्याठिकाणी जाऊन इसमांना जाब विचारले असता चार इसमांनी दूनेदार यांच्यावरही काठी, दगड व चाकूने प्राणघातक हल्ला चढवला यात ते गंभीर जखमी झाले. तसेच तिथे असलेल्या महिलेलाही मारहाण केली. दरम्यान प्रसंगावधान राखत त्यांनी पोलीस स्टेशन कुरखेडा येथे माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दरम्यान एका आरोपीस पकडण्यात यश आले असून यातील तीन आरोपी अद्याप फरार आहे. यावेळी गंभीर जखमी असलेले दूनेदार यांना कुरखेडा येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून आरोपींविरुद्ध कुरखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व इतर तीन आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here