The गडविश्व
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,गडचिरोली अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरीता केंद्रवती अर्थसंकल्प योजना अंतर्गत 2021-22 मध्ये पुढील प्रमाणे योजना मंजूर आहेत. करीता ईच्छुक उमेदवाराकडून विहीत नमुण्यात 22 मार्च 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथे विनामुल्य उपलब्ध् आहेत. तरी ईच्छुक लाभार्थ्यांनी संपूर्ण भरलेले अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रासह ( फोटो,आधार कार्ड,उत्पन्न प्रमाणपत्र,जात प्रमाणपत्र,जमिनीचा 7/12,गटाकरीता नोंदणी प्रमाणपत्र,बँक पास बुक,रहिवासी दाखला,ईत्यादी) दिनांक 22 मार्च 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे.अधिक माहिती करीता कार्यालय-प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,गडचिरोली येथे संपर्क साधावा.
न्युक्लिअस बजेट योजना सन 2021-22
योजनेचे नांव- अटी व शर्ती:- 1)अनुसूचित जमातीच्या D.ED उत्तीर्ण विद्यार्थ्यांना T.E.T.परिक्षा पुर्वप्रशिक्षण देणे,(3 महिने निवासी) प्रशिक्षणार्थी हा अनूसूचित जमातीचा व प्रकल्प कार्यक्षेत्रातील असुन डि.एड पास असावा.2) अनुसूचित जमातींच्या जेष्ठ नागरीकांना सेवा देण्यासाठी बहुउद्देशिय गृहसेवक प्रशिक्षण देणे, दोन वर्षाची योजना (प्रथम वर्ष निवासी ) लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा व प्रकल्प कार्यक्षेत्रातील असून शारीरीक दृष्टया सक्षम व गुन्हेगारी प्रवृतीचा नसावा, किमान 10 वी पास व 18 ते 20 वयोगटातील असावा.3) आदिवासी युवक/युवतींना NET/SET स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण देणे,(3 महिने निवासी) प्रशिक्षणार्थी हा अनुसूचित जमातीचा व प्रकल्प कार्यक्षेत्रातील असुन पदव्युत्तर (PG) असणे आवश्यक आहे. उक्त योजनेतील लक्षांक कमी जास्त करणे तसेच योजना रद्द करण्याचे अधिकार प्रकल्प अधिकारी यांना राहील. असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली आशिष येरेकर यांनी कळविले आहे.