केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर

251

The गडविश्व
नवी दिल्ली : ”जीवाची जोखम पत्करून दिलेल्या असाधारणपणे गुणवत्तापूर्ण सेवा” आणि कर्तव्य पार पाडताना प्राप्त केलेली आणि कायम राखलेली उत्कृष्टता यावरील “सेवेतील विशेष प्रतिष्ठित कामगिरी ” साठी प्रशंसा प्रमाणपत्रे आणि पदकांचा समावेश असलेल्या राष्ट्रपती पुरस्कारासाठी सीमाशुल्क कर्मचाऱ्यांचा विचार केला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर केले जातात.
यावर्षी, 29 अधिकारी/कर्मचाऱ्यांची “सेवेतील विशेष प्रतिष्ठित कामगिरी ” साठी प्रशंसा प्रमाणपत्रे आणि पदके प्रदान करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यात महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबई क्षेत्रीय विभागाचे प्रधान अतिरिक्त महासंचालक,राजेश पांडे , वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालय, मुंबई क्षेत्रीय विभागाचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी,अजित विश्राम सावंत, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर क्षेत्र, पुणे चे अधीक्षक अवधूत बी. खाडिलकर, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर क्षेत्र, मुंबई चे अधीक्षक एस. वेंकट सुब्रमण्यम, महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबई क्षेत्रीय विभागाचे हवालदार सुर्यकांत काशीराम वझे या महाराष्ट्रात कार्यरत पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या पुरस्कारांमध्ये समावेश आहे.
या अधिकाऱ्यांची निवड त्यांच्या संबंधित सेवा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय आणि दोषविरहित कामगिरीच्या आधारे करण्यात आली आहे.

पुरस्कार विजेत्यांची तपशीलवार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

श्री राजेश पांडे, प्रधान अतिरिक्त महासंचालक, महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबई झोनल युनिट;
श्री बिपीन कुमार उपाध्याय, अतिरिक्त संचालक, महसूल गुप्तचर संचालनालय, बेंगळुरू झोनल युनिट;
श्री व्ही.बी. प्रभाकर, संचालक, कॅबिनेट सचिवालय, नवी दिल्ली;
श्री समर नंदा, अतिरिक्त संचालक, विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन महासंचालनालय, नवी दिल्ली;
श्री ए. व्यंकडेश बाबू, सहाय्यक आयुक्त, सीमाशुल्क (प्रतिबंधक) झोन, तिरुचिरापल्ली;
श्री आनंद कुमार सावलम, सहाय्यक आयुक्त, सीमाशुल्क क्षेत्र, चेन्नई;
श्री वांदवासी दोराकांती चंद्रशेखर, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालय, विशाखापट्टणम झोनल युनिट;
श्री अजित विश्राम सावंत, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालय, मुंबई झोनल युनिट;
श्रीमती. निर्मला मेनन काळे, अतिरिक्त सहायक संचालक, मानव संसाधन विकास महासंचालनालय, नवी दिल्ली;
श्री शरद कुमार त्रिपाठी, अधीक्षक, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर क्षेत्र, भोपाळ;
श्रीमती. एल. अपर्णा, अधीक्षक, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर क्षेत्र, चेन्नई;
श्रीमती. वीणा राव, अधीक्षक, सीमाशुल्क (प्रतिबंधक) झोन, दिल्ली;
श्री अवधूत बी. खाडिलकर, अधीक्षक, केंद्रीय वस्तू व सेवा कर क्षेत्र, पुणे;
श्री एस. कल्याणी सुंदरी नागराजन, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालय, कोईम्बतूर झोनल युनिट;
श्री ब्रिजेंद्र सिंग, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालय, लखनौ झोनल युनिट;
श्री एस. वेंकट सुब्रमण्यम, अधीक्षक, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर क्षेत्र, मुंबई;
श्री श्रीश टी.के., वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, महसूल गुप्तचर संचालनालय, कोचीन झोनल युनिट;
श्री रंजन सेन, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, महसूल गुप्तचर संचालनालय, कोलकाता झोनल युनिट;
श्री करी वेंकट मोहन राव, अतिरिक्त सहाय्यक संचालक, नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स, अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटिक्स, विशाखापट्टणम;
श्री गिरीश गुप्ता, अधीक्षक, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान, नवी दिल्ली राज्यमंत्र्यांचे अतिरिक्त खाजगी सचिव (स्वतंत्र प्रभार);
श्री विवेक व्ही., अधीक्षक, सीमाशुल्क आणि केंद्रीय वस्तू आणि सेवा कर क्षेत्र, तिरुवनंतपुरम;
श्रीमती. एन. कृष्णवेणी, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, महसूल गुप्तचर संचालनालय, बेंगळुरू झोनल युनिट;
श्री राकेश रंजन, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, महसूल गुप्तचर संचालनालय, लखनौ झोनल युनिट;
श्री एस. करुणाकरन, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, महसूल गुप्तचर संचालनालय, चेन्नई झोनल युनिट;
श्री व्ही. बालाजी, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, महसूल गुप्तचर संचालनालय, चेन्नई झोनल युनिट;
श्री प्रबोध कुमार उपाध्याय, वरिष्ठ अनुवादक, कायदेशीर व्यवहार संचालनालय, नवी दिल्ली;
श्री दीपक सिंग, प्रशासकीय अधिकारी, वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालय, दिल्ली झोनल युनिट;
श्री संसार सिंह, गुप्तचर अधिकारी, महसूल गुप्तचर संचालनालय, नवी दिल्ली;
श्री सूर्यकांत काशीराम वाळे, प्रमुख हवालदार, महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबई झोनल युनिट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here