THE गडविश्व गडचिरोली : आज ३ जानेवारी २०२२ ला गडचिरोली तालुक्यातील खुर्सा येथे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती ज्ञानाई सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीच्या पुढाकाराने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुर्सा येथे रक्तदान शिबिर पार पडले.
या रक्तदान शिबिरामध्ये राजेंद्र आरेकर, ज्ञानेश्वर कीनेकार, सुरज सिडाम, संदिप आरेकर, छोटू लडके, राजन कठाने, प्रवीण बावणे, सिद्धार्थ रामटेके, भगवान पदा, प्रविण तिवाडे, अर्जुन कोरेटी, विजेश्वर मेश्राम, दुर्योधन कठाने, प्रविण भोयर, बालाजी बोरकुटे आणि स्वप्नील भोयर अशा एकूण १६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. या रक्तदान शिबिराचे आयोजन स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीचे कोषाध्यक्ष आकाश पि. आंबोरकर, सचिव मनोज पीपरे व गावप्रतिनिधी छोटू लडके यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक वासलवार, मडावी, उईके, हलामी, येनपेड्डीवार, विवेक सेलोटे, लखन देशमुख, आशिष आंबोरकर, गणेश सोनटक्के, राहुल मेश्राम खुर्सा नवेगाव येथील युवा वर्ग आणि गडचिरोली रक्तपेढीतील बीटीओ साखरे मॅडम, पीआरओ सतीश तडकलावार व टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- लाखोंची होते उलाढाल, पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा (चेतन गहाने) दि. २६ : पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याला झाडीपट्टी...