गडचिरोलीत दोनशे एकर जमिनीवर होणार विमानतळ

292

The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील दळणवळण अधिक गतिमान व्हावे यासाठी जिल्ह्यात सुमारे दोनशे एकर जमिनीवर विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी लागणाऱ्या जमीनीची उपयुक्तता तपासून घेण्यासाठी ही माहिती विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवावी असे श्रीमती वल्सा नायर यांनी सांगितले आहे. तर, विमानतळ उभारणीसाठी एअरपोर्ट अथॉरिटी कडून शक्यता (फिजीबलीटी) तपासून घेऊन यासाठी लागणारी तांत्रिक पाहणीकरण्यासाठी नागपूर येथून तज्ञ व्यक्ती पाठविण्यात येईल असे कपूर म्हणाले. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळींचे बैठकीत निश्चित करण्यात आल. यावेळी नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील हे दूरदृष्यप्रणाली मार्फत उपस्थित होते, तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास,अपर मुख्य सचिव नियोजन नितीन गद्रे, प्रधान सचिव नागरी विमान श्रीमती वल्सा नायर, वित्तिय सुधारना सचिव श्रीमती ए शैलजा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here