गडचिरोली : उदयापासून नगरपरिषदेत ई-वाहन प्रदर्शनीचे आयोजन

263

७ व ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शनीचे आयोजन

The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक नगर परिषदेतर्फे उदया ७ व ८ फेब्रुवारी रोजी दोन दिवस ई-वाहन प्रदर्शनिचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रदर्शनीला शहरातील नागरिकांनी भेट दयावी असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानातील वायू तत्वांतर्गत ई-वाहन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून वायू वाहन प्रदुषण कमी व्हावे व ई-वाहन वापरास प्रोत्साहन देण्यासाठी नगरपरिषदेच्या प्रांगणात ई-वाहन प्रदर्शनिचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनीला शहरातील नागरिकांनी भेट देवून माहिती घ्यावी तसेच ई-वाहन वापरास प्राधान्य द्यावे असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here