गडचिरोली : अवैध दारूविक्रेत्यांवर धाड, वाहनासह १ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त

790

– आरोपींवर गुन्हा दाखल

The गडविश्व
गडचिरोली, २३ जुलै : जिल्हयात दारूंदी असतांना चोरटया मार्गाने अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या दारूविक्रत्यांच्या गडचिरोली पोलीसांनी मुसक्या आवळत वाहनासह एकुण १ लाख ९ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी महिला आरोपीसह आठ जणांवर गडचिरोली पोलीस स्टेशन मध्ये दारूबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गडचिरोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात चोरटया मार्गाने अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती गडचिरोली पोलीसांना लागताच मिळालेल्या माहितीच्या आधारे १८ ते २१ जुलै दरम्यान कारवाई करत अवैध दारूविक्रत्यांकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यात आरोपी घनश्याम मडावी, रोशन मधुकर कुंभारे, परिक्षीत जितेंद्र पाल, श्रीमती आशा गणेश आंबटकर, राजेश्वर नामदेव ओगेवार, कैलाश यशवंत पुराम, मायाबाई प्रकाश तिवाडे यांचा समावेश आहे. सर्व आरोपींविरूध्द गडचिरोली पोलीस महाराष्ट्र दारूबंदी कायदयांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस करीत आहे.
गडचिरोली पोलीस स्टेशन परिसरात अवैध दारू विक्री, परीवहन, बनावटी ताडी/निरा, जुगार, सट्टा मटका, किंवा अवैध धंदयांबाबत गोपनीय माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन गडचिरोली येथ संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here