गडचिरोली : एसआरपीएफ जवानाने सहकाऱ्याची गोळी झाडून हत्या करून केली स्वतः आत्महत्या

1336

– घटनेने खळबळ
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत एसआरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्यावर गोळ्या झाडून हत्या केली व त्यानंतर स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या एसआरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्याची गोळी झाडून हत्या केली व त्यानंतर स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. अद्याप हत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास जिमलगट्टा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here