गडचिरोली : खंडणी मागीतल्या प्रकरणी आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

796

– कापड व्यवसायिकाला २० कोटी खंडणी मागीतल्याचे प्रकरण
The गडविश्व
गडचिरोली : शहरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकास २० कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. आलम अन्सारी (२४), सत्यम तोमर (२५), दिनेश गायकवाड (३७) सर्व रा. गडचिरेाली अशी अरोपींची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील एका व्यावसायिकाचे २०१९ साली अश्लिल विडीओ तयार करून तिन्ही अरोपींनी सदर विडीओ व्हायरल करण्याची धमकी देत व्यवसायीकाककडे वेळोवेळी पैशाची मागणी करत होते. तीन वर्षाच्या कालावधीत व्यावसायिकाकडून तब्बल १७.५ लाख रूपयांची रक्कम वसूल केली. आता आरोपींनी २० कोटी रूपयांची मागणी केली. एवढी रक्कम देणे शक्य नसल्याने कापड व्यावसायिकांनी याची तक्रार गडचिरोली पोलीस ठाण्यात दिली. तक्ररीच्या आधारे गडचिरोली पोलीसांनी मंगळवारी तिनही आरोपींना अटक केली व न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. अदयापही कापड व्यावसायिकाचे नाव गुलदस्त्यात असल्याने शहरात सदर प्रकरण चर्चेचा विषय ठरलेला असून या प्रकरणात पुन्हा काय वळण येते याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here