गडचिरोली जिल्हयात गेल्या पाच महिन्यात ३ हजार १०९ बालके कुपोषणातून मुक्त

610

– विशेष आहार योजनेला यश

The गडविश्व
गडचिरोली : लहान बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी गडचिरोली जिल्हयात 2 ऑक्टोबर 2021 पासून विशेष आहार योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. अंगणवाडी केंद्रातील 06 महिने ते 6 वर्ष वयोगटातील अति तीव्र कुपोषित, मध्यम तीव्र कुपोषित व तीव्र कमी वजनाच्या (SAM/MAM/SUW) बालकांना कुपोषनातून मुक्त करुन सर्वसाधारण श्रेणीत आणण्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या संकल्पनेतून विशेष आहार योजना राबविण्यात येत आहे. या कालखंडात एकूण 10041 कुपोषित बालकांमधील 3109 बालकांना कुपोषणातून मुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

ग्राम पंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून नियमित दिल्या जाणाऱ्या आहारा व्यतिरिक्त दिवसातून 1 वेळा विशेष आहार दिला जात आहे. या योजनेतून कुपोषीत बालकांचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने 9 प्रकारच्या पाककृती तयार करुन बालकांना अंगणवाडी केंद्रात 2 आक्टोंबर 2021 पासून देण्यात येत आहेत. त्यावेळी जिल्हयात गंभीर तीव्र कुपोषीत बालके 1017, मध्यम तीव्र कुपोषीत बालके 6094, गंभीरपणे कमी वजनाची बालके 2930 इतके होते. परंतु विशेष आहार 2 ऑक्टोंबर 2021 पासुन सुरु केल्यानंतर 5 महिन्यांच्या कालावधीनंतर माहे 28 फेब्रुबारी 2022 ते 04 मार्च 2022 या दरम्यान बालकांची वजन, उंची व आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये गंभीर तीव्र कुपोषीत बालके 504, मध्यम तीव्र कुपोषीत बालके 4310, गंभीरपणे कमी वजनाची बालके 2118 आढळून आले व कुपोषीत बालकांचे प्रमाण 3109 संख्येने कमी झालेले आहे. हे उपक्रम राबविणारा गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. संपुर्ण महाराष्ट्रात सध्या गडचिरोली पॅटर्न बाबात चर्चा सुरू असून त्याची अंमलबजाणी संपूर्ण महाराष्ट्रात केली जावू शकते. सदर योजना जिल्हयात नियमित चालू असून याकामास चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे जिल्हयातील कुपोषणाचे प्रमाण निश्चित कमी होण्यास मदत होत असून जिल्हा कुपोषण मुक्तीकडे वाटचाल करीत आहे अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास श्रीमती ए.के. इंगोले यांनी दिली.

याच कार्यक्रमाची दखल घेऊन सहयांद्री दुरदर्शनच्या टीमने आज गडचिरोली जिल्हयातील पारडी या गावातील अंगणवडी मध्ये येऊन कशा पध्दतीने पाककृती केली जाते व या आहारामुळे बालकांमध्ये कशा पध्दतीने बदल घडून आले याची दखल घेतली.

विविध प्रकारच्या 9 पाककृती : व्हेज खिचडी, मुठे, शेंगदाण्याची पोळी, तिरंगा पुरी/पराठा, कडीपत्ता चटणी सुखी, मुंकी नट्स, लाडू, गोडलिंबाचे शंकरपाळे व अंकुलीत कटलेट यांचा समावेश विशेष आहार योजनेत करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here