गडचिरोली जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या उद्या होणारा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगीत

348

– निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता 
The गडविश्व
गडचिरोली, १२होणार जुलै : गडचिरोली जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उद्या १३ जुलै रोजी नियोजीत करण्यात आला होता. आता हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्हा परिषद आणि प्रशासनाचा कार्यभार सध्या प्रशासनाकडे आहे. निवडणुका पार पाडण्यासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उद्या १३ जुलै रोजी करण्यात आला होता. मात्र आता राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचे पत्रान्वये उद्या १३ जुलै २०२२ रोजी राबविण्यात येत असलेला गडचिरोली जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १२ पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तुर्तास स्थगीत करण्यात आला आहे. असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
त्यामुळे आता जिल्ह्यातील निवडणूका लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. तर एकीकडे ओबीसी अरक्षणाशिवाय निवडणुका नकोत अशी सुद्धा मागणी आहे त्यामुळे ओबीसी आरक्षण जाहीर करूनच निडणुकांचे आरक्षण जाहीर करण्यात येईल का ? आशा चर्चाणा सुद्धा उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here