The गडविश्व
गडचिरोली : माहिती व प्रसारण मंत्रालय,भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो,वर्धा आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्यातर्फे गडचिरोली जिल्ह्यात पाच दिवस कलापथकाद्वारे पोषण पखवाडा विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
या अभियानात सुभेदार रामजी बहुउद्देशिय संस्था,चंद्रपूरच्या कलावंताद्वारे कलापथकाच्या माध्यमातून नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.हे कार्यक्रम चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै,दिनांक १ एप्रिल २०२२ रोजी भामरागड तालुक्यातील लाहेरी,२ एप्रिलला धानोरा तालुक्यातील पेंढरी,३ एप्रिलला कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी,४ एप्रिलला कोरची तालुक्यातील मसेदी येथे होणार आहे.या कार्यक्रमात गरोदर माता व बालकांसाठी आरोग्य विषयक माहिती लोकांपर्यंत पोहचवून जनजागृती करण्यात येणार आहे,अशी माहिती क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो,वर्धा यांच्याद्वारे कळविण्यात आली आहे.