– गट विकास अधिकारीडी. एस. साळवे यांचे नागरिकांना आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, २१ सप्टेंबर : पंचायत समिती गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरिकांनी “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा” मध्ये नागरिकांना सहभागी घ्यावा असे आवाहन ल गट विकास अधिकारी डी. एस. साळवे यांनी केले आहे.
सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत पूर्ण व्हावीत या अनुषंगाने राज्य शासनाकडून “आपले सरकार सेवा केंद्र” अविरतपणे कामे पार पाडीत आहे. या पार्शभूमीवर १७ सप्टेंबर २०२२ ते ०२ आक्टोंबर २०२२ पर्यंत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा” पंचायत समिती, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. जनतेशी निगडीत असणाऱ्या महसूल, ग्रामविकास, कृषी, आरोग्य, आदिवासी विभागाशी निगडीत प्रलंबित असणारे दाखले किव्हा प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था पंचायत समिती आपले सरकार सेवा पोर्टल द्वारे करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी सदर सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आई आवाहन गट विकास अधिकारीडी. एस. साळवे यांनी केले आहे.