The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २० ऑक्टोबर : तालुक्यातील दुधमाळा गावानजीक आयशर ट्रकने दुचाकी वाहनाला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरुवार २० ऑक्टोबर ला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. रमेश गिरीधर भोयर (अंदाजे वय ४५) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक रमेश भोयर हे धानोरा येथील वनविभागात कार्यरत होते. ते गुरुवार २० ऑक्टोबर ला धानोरा येथून गडचिरोली ला कामानिमित्त गेले आणि परत गडचिरोली येथून धानोरा येथे परत येत असतांना दुपारी १२ वाजताच्या सुमारास गडचिरोली ते धानोरा या राष्ट्रीय महामार्गावरील दुधमाळा गावानजीक ट्रकने जबर धडक दिली व चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेने भोयर कुंटूबावर दुखाचा डोंगर कोसळला. अपघाती निधनाने धानोरा तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
#gadchiroli #roadaccident #gadchiroli accident #dhanora #gadchiroli news