The गडविश्व
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने १३६ पदांकरीत पोलीस भरती आयोजित करण्यात आली होती. सदर भरतीची रविवार १९ जून रोजी लेखी परीक्षा शांततेत पार पडली असून पोलीस दलाच्या वतीने लेखी परीक्षेची १९ जून रोजी रात्रो उशिरा उत्तरतालीका जाहीर करण्यात आली होती. सोबतच उत्तरतालीका संदर्भात काही सूचनाही जारी करण्यात आल्या होत्या व उत्तरतालिका प्रसारीत झाल्यानंतर ३६ तासांच्या आत उत्तरतालिकेत दिलेल्या उत्तरासंबंधात उमेदवारांना काही आक्षेप असल्यास आपल्या जवळच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय / पोस्टे/उपपोस्टे/पोमके / पोलीस मुख्यालय या ठिकाणी लेखी आक्षेप नोंदवावा किंवा समाधान कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या मो. क्र. ८८०६३१२१०० या क्रमांकावर संपर्क साधुन उमेदवारांनी आपला आक्षेप नोंदवावा असे कळविण्यात आले होते. आता या पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे.
उत्तरतालिका
Gadchiroli police recruitment 2022_answer keys
गडचिरोली जिल्हा पोलीस भरती – 2022 करीता गडचिरोली जिल्हयातील एकुण 16848 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. सदर लेखी परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली असुन, पहील्या टप्प्यात सामान्य क्षमता चाचणीचा पेपर १९ जून रोजी सकाळी ११.०० ते १२.३० वा. व गोंडी भाषेचा पेपर दुपारी २.३० ते ४.०० वा. घेण्यात आला. याकरीता गडचिरोली पोलीस दलामार्फत १६ परीक्षा केंद्राची व्यवस्था करुन, केंद्राच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. बंदोबस्ताकरीता २००० चे आसपास पोलीस अधिकारी व अंमलदारांची नेमणुक करण्यात आली होती. गडचिरोली जिल्हा पोलीस भरती -२०२२ पासुन कोणतेही उमेदवार वंचित राहु नये म्हणुन वेळोवेळी सोशल मिडीया मार्फत गडचिरोली पोलीस दलाकडुन सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे बहुसंख्य उमेदवारांनी लेखी परीक्षेकरीता आपली हजेरी लावल्याचे दिसुन आले.
गडचिरोली पोलीस भरती लेखी परीक्षा-२०२२ करीता
अंतिम उत्तरतालिका सुची प्रसारीत करण्यात येत आहे. pic.twitter.com/BqJDZ7Pi15— GADCHIROLI POLICE (@SP_GADCHIROLI) June 21, 2022
गडचिरोली पोलीस भरती लेखी परीक्षा-२०२२ : अंतिम उत्तरतालिका जाहीर#gadchirolipolice#पोलीसभर्ती#gadchirolipolicerecrutment2022#policereciretment pic.twitter.com/3vaHuaiIxy
— THE GADVISHVA (@gadvishva) June 21, 2022