गडचिरोली : पोलीस शिपायाची गोळी झाडून आत्महत्या

1256

The गडविश्व
गडचिरोली : पोलीस शिपायाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना काल २० फेब्रुवारी रोजी रात्रो ८ वाजताच्या सुमारास अहेरी येथे उघडकीस आली. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. प्रमोद शेकोकर असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रमोद शेकोकर हे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे सुरक्षा रक्षक होते. काल अहेरी येथील पावर हाऊस कॉलनीतील अपार्टमेंट मध्ये त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. शेकोकर याची पत्नी सुद्धा पोलीस विभागात असून त्या ताडगाव पोलीस मदत केंद्रात कार्यरत आहेत.
सदर घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अद्याप आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here