गडचिरोली : बसथांब्यावर खासगी वाहने थांबविल्यास दंड, वनविभागाचा अजब फतवा

319

– चामोर्शी तालुक्यातील आष्टी आलापल्ली मार्कंडा (कं) येथील बसथांब्यावर लावला  सूचना फलक

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयालील वनविभागाने लावलेल्या सूचना फलकामुळे शालेय विद्यार्थ्यांची तसेच अवागमन करणाऱ्य सामान्य नागरिकांची चांगलीस गोची झाली आहे. तसेच फलकावरील अजब फतव्यामुळे सदर सूचना फलक चांगलाच चर्चेत आला आहे.
चामोर्शी तालुक्यातील आष्टी आलापल्ली मार्कंडा (कं) येथील बसथांब्यावर खासगी वाहने थांबविल्यास दंडात्मक करावाई करण्याचे सूचना फलक चपराळा अभयारण्य वन्यजीव चैडमपल्ली वनविभागाने लावले आहे. वनविभागाच्या या फलकामुळे शालेय विद्यार्थी तसेच अवागमण करणाऱ्यां नागरिकांची चांगलीच गोची होत आहे. वाहने बसथांब्यावर थांबलीच नाही तर शालेय विद्यार्थी व नागरिकांनी प्रवास करायचा कसा असा सवाल उपस्थित होत आहे. आधीच एसटी कर्मचाऱ्यांचे संप सुरू असल्याने बसेस बंद आहेत यामुळे खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. पंरतु बसथांब्यावरच खासगी वाहन थांबविल्यास दंडात्मक करावाई करण्यात येईल असे फलकाव्दारे जाहीरपणे वनविभाने सांगितल्याने मात्र परिसरातील नागरिकांची तसेच शालेय विद्यार्थ्यांची गोची होतांना दिसत आहे.
आष्टी आलापल्ली मार्गावरील मार्कंडा (कं) येथील बस थांब्यावर चपराळा अभयारण्य वन्यजीव चैडमपल्ली वन विभागाव्दारे सूचनेचे फलक लावण्यात आले आहे. फलकावर फाटयावरील बस थांब्यावर ट्रक, बस, कार, दुचाकी आदी वाहन थांबविल्यास सक्त मनाई आहे. वाहन थांबविल्यास संबंधित वाहन धारकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ट्रक व बस 500 रूपये, कार, जिप,मेटाडोर 1000 रूपये, मोटारसायकल 100 रूपये प्रमाणे दंड आकारण्यात येईल असे फलकात नमुद करण्यात आले आहे.
मार्कंडा (कं) येथील फाटयावरून आलापल्ली, घोट, मुलचेरा जाणारा मार्ग असल्याने प्रवाशांना याच फाटयावरून ये जा करावी लागते. तसेच मार्कंडा (कं) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने आष्टी परिसरातील अनेक नागरिक उपचारासाठी येथे जात असतात. त्यामुळे रूग्णांना देखील याच थांब्यावर उतरावे लागते. मात्र वनविभागाच्या अजब फतव्यामुळे याचा फटका परिसरातली नागरिकांना बसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here