गडचिरोली : बोटेहुर येथील शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

480

The गडविश्व
धानोरा : तालुक्यातील पेंढरी पोलीस स्टेशन हद्दीतील बोटेहुर येथील एका युवा शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ८ एप्रिल २०२२ ला घडली. मंगेश झिरु आतला (३३) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, धानोरा तालुक्यातील पेंढरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोटेहूर गावातील मंगेश झिरु आतला हा ८ एप्रिल २०२२ रोजी गावातील कार्यक्रम आटोपून रात्री जेवण करून घरी झोपी गेला. मात्र मोहफुल गोळा करण्याचा हंगाम सुरू असल्याने पहाटे साडेचार वाजता पत्नी सुशीला ही उठवायला गेली असता झोपेतून उठतच नाही म्हणून घरातील इतर मंडळींना सांगितले व गावातील नागरिकही जमा झाले तेव्हा मंगेश मृत पावल्याचे लक्षात आले. दरम्यान झोपलेल्या खाटेजवळच कीटकनाशकाची बाटली आढळून आली. यावेळी मंगेश बाबत अधिक जाणून घेतले असता कोणाकडून तरी त्याने शेतीसाठी पैसे घेतले होते मात्र पीक न झाल्याने परतफेड कशी करावी या विवंचनेत असल्याचे बोलल्या जाते आहे. त्याच नैराश्यातुन आत्महत्या केली असल्याचा अंदाज लावल्या जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ वर्षाची मुलगी, आई, वडील व भाऊ असा आप्त परिवार आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here