गडचिरोली : ‘भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी’ उत्साहात संपन्न

1106

– उपविभाग कुरखेडाच्या पवनपुत्र क्रिडा मंडळ, विरसी संघाने पटकाविला प्रथम क्रमांकाचे बक्षीस
– गडचिरोली पोलीस दल आयोजित पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन स्पर्धेचे आयोजन

The गडविश्व
गडचिरोली : पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन व पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे संकल्पनेतून ‘वीर बाबुराव शेडमाके भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी’ पोलीस मुख्यालय मैदानावरील वीर शहीद पांडु आलाम या सभागृहात ०८ एप्रिल २०२२ पासुन सुरु होती. या कबड्डी स्पर्धेचे अंतिम सामने काल ०९ एप्रिल २०२२ रोजी पार पडले असून, कुरखेडा उपविभागाच्या पवनपुत्र क्रिडा मंडळ, विरसी संघाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धेमध्ये उपविभागीय स्तरावरील स्पर्धेतील, वीर बजरंग क्लब हलवेर (भामरागड), गोंडवाना कबड्डी संघ जिमलगट्टा, उडान कबड्डी क्लब संघ सिरोंचा, बाजीराव फिटनेस क्लब संघ कृष्णार (एटापल्ली), जय ठाकुरदेव क्लब परसलगोंदी (हेडरी), नवयुवक क्रिडा मंडळ कोरेली (बु.) अहेरी, महाराणा प्रताप क्लब गडचिरोली, एकलव्य क्रिडा मंडळ जेवलवाही ( धानोरा) , पवनपुत्र क्रिडा मंडळ विरसी (कुरखेडा), जय बजरंग क्लब कारवाफा (पेंढरी) अशा १० संघातील १२० खेळाडुंनी आपला सहभाग नोंदवला होता.
या १० संघामध्ये २ दिवसांपासून पोलीस मुख्यालय मैदानावर रोमहर्षक लढती पार पडल्या. यामध्ये उपविभाग कुरखेडाच्या पवनपुत्र क्रिडा मंडळ, विरसी संघाने प्रथम क्रमांक, उपविभाग हेडरीच्या जय ठाकुरदेव क्रिडा मंडळाने दुसरा क्रमांक तर उपविभाग धानोराच्या एकलव्य क्रिडा मंडळ जेवलवाही, संघाने तिसरा क्रमांक पटकावला.यावेळी प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला २५ हजार रुपये रोख, ट्राफी व संघातील सर्व खेळाडुंना प्रशस्तीपत्र, गोल्ड मेडल, तसेच दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या संघाला २० हजार रुपये रोख, ट्राफी व संघातील सर्व खेळाडुंना प्रशस्तिपत्र, सिल्व्हर मेडल, तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या संघाला १५ हजार रुपये रोख, ट्राफी व संघातील सर्व खेळाडुंना प्रशस्तिपत्र व ब्रांझ मेडल तर उपविभाग भामरागडच्या वीर बजरंग क्लब, हलवेर संघास उत्तेजनार्थ बक्षीस ५००० हजार रुपये रोख व सर्व खेळाडुंना प्रशस्तिपत्र देवुन गौरवण्यात आले. तसेच उत्कृष्ट रीडर दिपक ठाकरे पवनपुत्र क्रिडा मंडळ विरसी ( कुरखेडा), उत्कृष्ट ऑलराऊंडर- आशिष सोनवाणी, एकलव्य क्रिडा मंडळ जेवलवाही (धानोरा), उत्कृष्ट डिफेंडर सचिन आरमा, जय ठाकुरदेव क्लब परसलगोंदी (हेडरी) या खेळाडुंना यु-मुंबाची ट्राफी व प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले. याबरोबरच यु-मुंबाचे टिम लिडर संदिप सिंग व यु-मुंबा संघाचे उत्कृष्ट खेळाडू अभिषेक सिंह यांचा शाल श्रीफळ, मोमेटो, प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली प्रणिल गिल्डा, यु-मुंबाचे टिम लिडर संदिप सिंह, यु-मुंबा संघाचे उत्कृष्ट खेळाडू अभिषेक सिंह यांचे हस्ते शहीद पांडु आलाम सभागृहात पार पडले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे / उपपोस्टे/पोमकें तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, प्रोपागंडा व जनसंपर्क शाखेचे प्रभारी अधिकारी अशोक माने व अंमलदार यांनी अथक परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here