गडचिरोली : मासे पकडणे बेतले जीवावर, नाल्यात वाहून गेला इसम

1694

– आरमोरी तालुक्यातील घटना
The गडविश्व
गडचिरोली, ४ जुलै : जिल्ह्यातील अनेक भागात आज संततधार पाऊस पडला. दरम्यान पावसाने नाल्याच्या वाहत्या पाण्यात मासे पकडण्याचा बेत आखून मासे पकडणे जीवावर बेतले आहे. मासे पकडण्यासाठी नाल्यावर आपल्या सहकार्यासोबत गेलेला एक इसम वाहून गेल्याची घटना आरमोरी तालुक्यातील वसा येथील कोलांडी नाल्याजवळ घडली. राजकुमार एकनाथ राऊत (३८ रा. देलोडा बुज असे वाहून गेलेल्या इसमाचे नाव आहे.
जिल्ह्यात मागील ४८ तासात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोरडे पडलेले नदी नाले वाहू लागले आहेत. सोमवारी दिवसभर संततधार पाऊस होता. त्यामुळे नाल्यावर मासे पकडण्याचा बेत आखून राजकुमार राऊत हा शंकर लोमेश राऊत, विलास एकनाथ राऊत, ऋषी नामदेव कलसार व प्रकाश हिरामण मडावी सर्व राहणार देलोडा ( बुज) यांच्यासोबत वसा येथील नाल्यावर गेला होता. दरम्यान नाल्यात उतरल्यानंतर खोल पाण्याचा अंदाज न आल्याने राजकुमार हा नाल्यात वाहून गेला. यावेळी ऋषी कलसार, प्रकाश मडावी व अजून एकजण हेही पाण्यात बुडाले होते, मात्र त्यांना मच्छिमारांच्या सहाय्याने वाचवण्यात यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here