गडचिरोली : मुलाने केली पित्याची हत्या, आरोपीस २ तासात अटक

816

अवघ्या २ तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश
The गडविश्व
गडचिरोली : मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या विसापूर टोली येथे मुलाने पित्याची हत्या केल्याची घटना आज ३ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. दामोदर तागडे (५५) असे हत्या करण्यात आलेल्या पित्याचे नाव असून तेजस दामोदर तागडे (२४) असे आरोपी मुलाचे नाव आहे. घटनेबाबत बाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पोलिसांनी लागलीच आरोपी मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान आरोपी हा घटणास्थळावरून फरार झाला होता, पोलिसांनी तपासचक्र जलद गतीने फिरवत अवघ्या २ तासात आरोपी मुलाच्या मुसक्या आवळल्या.
मृतक दामोदर यांना दोन मुले असून मोठा मुलगा हा पोलीस विभागात कार्यरत आहे तर लहान मुलगा हा बेरोजगार होता. आज सकाळच्या सुमारास आरोपी मुलाचे पित्यासोबत वाद झाले यावेळी तेजसने कुऱ्हाडीने पित्याची हत्या केल्याचे पोलीस तापसामध्ये निष्पन्न झाले.
पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गौरव गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन चव्हाण,तेजस मोहिते यांच्या नियोजनबद्ध तपासा मुळे आरोपीच्या अवघ्या दोन तासात मुसक्या अवळण्यात आल्या. पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here