गडचिरोली येथील दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल

244

The गडविश्व
गडचिरोली : शहरातील मच्छी मार्केट परिसरात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्याकडून ६ हजार रुपयांची देशी दारू जप्त केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या बुधवारी केली. याप्रकरणी शंकर मोहुर्ले या विक्रेत्यावर गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोली शहरातील मच्छी मार्केट परिसरात खुलेआम एक विक्रेता दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने मार्केट परिसरात पाळत ठेवली. दरम्यान एकाला देशी दारूची विक्री करताना पकडण्यात आले. तसेच त्याच्याकडून ६ हजार रुपये किमतीची १०० टिल्लू दारू जप्त करण्यात आली. सदर कारवाई ठाणेदार अरविंद कुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली नापोशि धनराज चौधरी, स्वप्नील कुलावळे, संजय कांबळे, परशुराम हीचामी, सुजाता ठोंबरे यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर व उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here