गडचिरोली येथील भैरवी भरडकर हिने राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत पटकाविले रजत पदक

463

– गडचिरोली जिल्हयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट बॉक्सिंग असोसिएशनतर्फे पुण्यात आयोजीत राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत गडचिरोल येथील भैरवी भरडकर हिने उत्कृष्ठ कामगीरी करत रजत पदक पटकाविले आहे. तिच्या यशाने गडचिरोली जिल्हयाच्या शिरपेचात पुन्हा भर पडली असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुणे येथे महाराष्ट बॉक्सिंग असोसिएशनतर्फे राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद दहाव्या सब ज्युनियर मुल मुलींच्या स्पर्धेत भैरवी भरडकर हिने ४६ ते ४८ किलो वजन गटात उत्कृष्ठ कामगिरी करत अकोला व नागपूर जिल्हयाला हरवून अंतिम लढतीत उत्कृष्ठ कामगिरी करत रजत पदक पटकाविले आहे. याआधिसुध्दा राज्य स्तरावर अनेक पदके जिंकून गडचिरोली जिल्हाचा नाव राज्य स्तरावर चमकविले आहे.
तिच्या या यशाबद्दल गडचिरोली बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जगदीश मस्के, सचिव यशवंत कुरडकर, जिल्हा क्रिडा अधिकारी प्रशांत धोंदल, क्रिडा अधिकारी संदीप खोब्रागडे, कुस्ती प्रशिक्षक बडगेलवार, रोहित विष्णोई, संजय मानकर, प्रविण मेश्राम, पारस राउत, अक्षय कोवासे, दीपक खरवडे तसेच गडचिरोली बॉक्सिंग परिवाराने शुभेच्छा दिल्या आहेत. सदर खेळाडू गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे नियमित खेळाडू असून त्यांना बॉक्सिंग प्रशिक्षक पंकज मडावी, महेश निलेकार, संतोष गैनवार, निखील इंगडे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here