गडचिरोली येथे जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन साजरा

176

The गडविश्व
गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 19 जून 2022 रोजी “19 जून जागतीक सिकलसेल आजार नियंत्रण” या कार्यक्रम निमित्त रॅली व सिकलसेल आरोग्य तपासणी उद्घाटन सोहळा जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली डॉ. दावल साळवे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली डॉ. अनिल रुडे, यांचे संयुक्त विद्यमाने हिरवी झेंडी दाखवून सकाळी 9.00 वाजता महिला व बाल रुग्णालय, गडचिरेाली येथून रॅली काढण्यात आली. सदर रॅलीचे समारोप व सिकलसेल रुग्णाचे तपासणी शिबीराचे आयोजन महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली डॉ. दावल साळवे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली डॉ. अनिल रुडे, यांचे संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. तसेच सिकलसेल रुग्णांची आरोग्य तपासणी यात (CBC, LFT, KFT, HB) सिरम थेरेपीची तपासणी करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.दावल साळवे यांनी सिकलसेल रुग्णांची तपासणी व औषधोपचारची सेवा जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रात करण्यात उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यात सिकलसेल ग्रस्त रुग्णांची संख्या 2535 व वाहक रुग्ण 33701 आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली डॉ. अनिल रुढे यांनी विवाहपुर्वी सिकलसेल तपासणी करण्यात यावे तसेच प्रसुतीपुर्व गर्भजल तपासणी करुन सिकलसेल आजारास नियंत्रण करता येईल या करीता समाजामध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती जास्तीत जास्त प्रमाणात करणे आवश्यक आहे असा संदेश देण्यात आलेला आहे. तसेच जिल्हा साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री यांनी सुद्धा सिकलसेल आजार नियंत्रणात आणण्याकरीता समाजामध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती मोठया प्रमाणात करणे आवश्यक आहे. सदर कार्यक्रमाला वैद्यकीय अधिक्षक महिला व बाल रुग्णालय डॉ. सोयाम यांनी सदर कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता विशेष सहकार्य केले. तसेच सदर कार्यक्रमाला डॉ. पंकज हेमके, डॉ. रुपेश पेंदाम,डॉ. प्रशांत हेमके इ. सन्मानीय अधिकारी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये सिकलसेल रुग्णांची नोंद करुन विविध तपासणी करीता रक्त नमुने घेण्यात आले. तसेच औषधोपचारबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सिकलसेल रुग्णांना विविध योजनाबाबत माहिती सिकलसेल समुपदेशक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली, श्रीमती निता बालपांडे यांनी दिली. सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्वपनील चापले, यांनी व एच.एल.एल. प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी सर्व रुग्णांचे रक्त नमुने घेऊन विविध आजाराबाबतची तपासणी केली.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती रचना फुलझेले जिल्हा सिकलसेल समन्वयक यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार डी.आय.सी. व्यवस्थापक प्रशांत खोब्रागडे यांनी मानले. तसेच समुह संघटक धिरज सलोटे, गोपाल पेंदाम, श्रीमती नीता बालपांडे, स्वपनील चापले, गोविंदा दिघोरे, प्रभाकर वाघाडे राष्ट्रीय आरोग्य अभियानचे इतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here