गडचिरोली येथे नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

252

– ६ जून ते ५ जुलै कालावधीत होणार प्रशिक्षण
The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, गडचिरोली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था, (BARTI) पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता गडचिरोली येथे “निशुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम” ०६ जून ते ०५ जुलै २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रमामध्ये उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, उद्योगसंधी मार्गदर्शन, उद्योगाची निवड, यशस्वी उद्योजकांचे अनुभव व कथन, शासनाच्या व महामंडळाच्या विविध कर्जयोजनांची माहिती, जिल्हा उद्योग केंद्राचे कर्ज विषयक योजना, आयात निर्यात, सिद्धी प्रेरणा, डिजिटल मार्केटिंग ई. विषयावर तज्ञा मार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तरी इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती व प्रवेशाकरीता ३० मे २०२२ पूर्वी प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड,मो.९४०३०७८७७३ एमसीईडी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र,एम.आय.डी.सी.रोड,गडचिरोली व कु.विद्या गडमवार,कार्यक्रम समन्वयक,मो. ९६०७०६७५३८ यांना संपर्क करावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी के.व्ही.राठोड, एम.सी.ई.डी.गडचिरोली यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here