– घरांची केली नासधूस, धान पुंजण्याचे नुकसान
THE गडविश्व
गडचिरोली : जिल्हयात परराज्यातून दोन महिन्यांपूर्वी रानटी हत्तींनी प्रवेश केला आहे. तर 2 जानेवारी रविवारच्या रात्री हत्तींनी गावात घुसण्यास अटकाव झाल्यानंतर धानोरा तालुक्यातील मुरूमगाव वनपरिक्षेत्रात रात्रभर कहर माजविल्याची घटना घडली. हत्तींच्या या रौद्ररूपात पोटावी टोला येथील 2, आंबेझरी येथील 1 तर दराची येथील एका घराची नासधूस झाली. या घटनेने पुन्हा परिसरात रानटी हत्तींच्या दशहतीचे वातावरण पसरले आहे.
परराज्यातून गडचिरोली जिल्हयात रानटी हत्तींनी प्रवेश केल्यापासून मुरूमगाव वनपरिक्षेत्रात धुकाकुळीची मालिका सुरूच आहे. या हत्तींनी रविवारच्या रात्री धानोरा तालुक्यातील सुरसुंडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पोटावी टोला गावात प्रवेश करीत दोन घरांची नासधूस केली. याची माहिती वनविभागला माहित होताच पश्चिम बंगालच्या पथकाला पाचारण करून हत्तींना गावातून धूडकावून लावले. त्यांनत हत्तींनी आपला मोर्चा भोजगाठा गावाकडे वळविला. या दरम्यानच्या कालवधीत वनविभागाच्या पथकाने सुटकेचा श्वास घेतला असताच पथकाच्या कर्कश आवाजामुळे पिसाळलेल्या हत्तींनी जंगलात पळ काढला. मात्र हत्तींच्या या मार्गक्रमात आलेल्या आंबेझरी व दराची येथील घरांचे नुकसान झाले. पहाटेच्या सुमारास हत्तींनी पुन्हा जंगलाच्या दिशेने पळ काढला असता पुन्हा काल सोमवारी सकाळच्या सुमारास हत्तीनी दराची येथील घराची नुकसान केलेल्या इसमाच्या शेतशिवारात उभ्या असलेल्या धानाच्या तीन पुंजण्याचे हत्तींनी नुकसान केले.