गडचिरोली वनपरिक्षेत्रात बिबट मृतावस्थेत आढळला

1414

– मुडझा गावालगतच्या झुडपी जंगलातील घटना
The गडविश्व
गडचिरोली, ३० ऑक्टोबर : वनपरिक्षेत्रातील गडचिरोली बिटामधील कक्ष क्रमांक १६८ मध्ये बिबट मृतावस्थेत आढळून आल्याची घटना आज ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मुडझा गावालगतच्या कक्ष क्रमांक १६८ मधील झुडपी जंगलात वनकर्मचारी गस्त करीत असतांना बिबट हा मृतावस्थेत आढळून आला. घटनेच्या माहितीवरून गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे)अरविंद पेंदाम, क्षेत्रसहाय्यक श्रीकांत नवघरे, बोदलीचे वनरक्षक भसारकर, चांदाळाचे वनरक्षक गौरव हेमके व वाघ संनियंत्रक पथक, गडचिरोली व अधिनस्त संपुर्ण वनाधिकारी / कर्मचारी यांनी घटना स्थळावर जाऊन मौका स्थळाची पाहणी केली असता, मृत बिबट हा अंदाजे दिड ते दोन वर्ष वयोगाटाचा असावा असा तर्क लावण्यात येत असून शरीरावर कुठल्याही जखमा आढळुन आल्या नाही.
दरम्यान सदर बिबटयाचे मृत शरीराचे शवविच्छेदन डॉ. बि.ए. रामटेके, पशुधन विकास अधिकारी, पोटेगांव यांनी केले. प्राथमीक स्वरुपात मृत्यूचे कारण अदयाप कळले नसले तरी गोळा केलेल्या नमुन्याचे परिक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर समोर येणार आहे.
वनाधिकारी सहाय्यक वनसंरक्षक एस.बी. भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी अ.नि. पेंदाम यांनी प्राथमीक चौकशी केली असता, शरीराचे सर्व अवयव शाबुत असल्याने (नख, मिशा, पंजे इत्यादी) व आजुबाजुला शिकारी बाबतचे कुठलेही ठोस पुरावे आढळले नाही.
सदर संपूर्ण कार्यवाहीत वन्यजीव मानद रक्षक मिलींद उमरे व वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर तसेच ग्रामपंचायत मुडझा येथील पोलीस पाटील सौ. लोचन महेंद्र मेश्राम (मुडझा बु.), तुलाराम आबाजी राऊत, पोलीस पाटील मुडझा तुकूम व सौ. सुरेखा अनिल सुरपाम, ग्रामपंचायत सदस्या मुडझा हे सुध्दा उपस्थीत होते. मृत बिबटयाचे शवविच्छेदन करून मृत शरीरास अग्नी देऊन सर्वांसमक्ष नष्ट करण्यात आले.

सदर प्रकरणावरुन आजुबाजुच्या परिसरात बिबट व त्यांचे शावक असल्याचे संशय व्यक्त केल्या जात आहे. घटना स्थळाच्या आजुबाजुच्या जंगल परिसरात गावकऱ्यांनी जाऊ नये व आपले पाळीव प्राणी सुध्दा या भागातील जंगलात नेऊ नये असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांनी केलेले आहे.
सदर घटनेची चौकशी उप वनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांचे मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक सोनल भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम हे करीत आहे.

#gadchirolinews #Leopard deth # mudza #forest gadchiroli #

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here