The गडविश्व
गडचिरोली, २३ ऑगस्ट : राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषदेत द्वारा शिक्षण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांसाठी ‘स्वच्छ विद्यालय’ राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
आदिवासी विकास विभाग गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कुरंडीमाल ला देखभाल व दुरुस्ती या श्रेणीमध्ये स्वच्छ विद्यालय पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा परिषद गडचिरोली येथील सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद (भाप्रसे) यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधव यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.