गणपुर रै. येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

218

The गडविश्व
चामोर्शी : महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालय गणपुर रै येथे आज ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी ग्रामपंचायतचे उपसरपंच जीवनदाजी भोयर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भोयर मार्गदर्शन करताना म्हणाले की महात्मा फुले यांच्या विचारावर आपण कार्य करत जीवन जगलो तर आपले जीवन आणि समाज जीवनामध्ये सुद्धा परिवर्तन होईल. त्यांच्या काळात मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करून मुलींसाठी शाळा उभारली. आत्ताच्या काळात सर्व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी वाचनालयात अभ्यास करून पुढे प्रगती करून आपल्या जीवनात भरघोष यश संपादन करतील, हेच आजच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन असेल असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष प्रशांतजी मेकलवार, सदस्य सचिन वेलादी, देवेंद्र चीताडे, लीलाधर खरबनकर, जय राऊत कुणाल परसोडे, शुभम डोके, रितिक भंडारी, गोविंदा गेडाम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here